मुंबई : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांनी निवडणूक अर्ज दाखल केल्यानंतर त्यांचा निवडणूक प्रचार जोर धरू लागला आहे. शिवसेना-भाजपा-रिपाइं (ए)-रासप-रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते कीर्तिकरांच्या रथफेरीत आणि चौकसभेत मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.
काल सायंकाळी अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्रात वर्सोवा मेट्रो स्टेशन, भारत नगर, जुहू सर्कल, मांगेला वाडी, जुहू तारा रोड,सी.डी.बर्फीवाला मार्ग, गुलमोहर रोड, समता नगर या विभागात रथफेरी काढून प्रचार केला केला तर आज सकाळी दिंडोशी विधानसभेत बाणडोंगरी,तानाजी नगर, भीमनगर, आनंदवाडी, आदर्शनगर, त्रिवेणी नगर या परिसरात रथफेरी पार पाडली. यावेळी लोकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला तर काही ठिकाणी श्री.कीर्तिकर यांनी थांबून मतदारांशी संवाद साधला.
या प्रचार फे-यांमध्ये भाजपाचे आमदार अमित साटम, शिवसेना आमदार सुनिल प्रभु, माजी मनपा विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर, विधानसभा संघटक सुनील खाबीया, महिला विभाग संघटक सौ.साधना माने, विधानसभा संघटक विणा टॉक,नगरसेविका दक्षा पटेल, सुधा सिंग, रोहन राठोड, सुचित्रा नाईक, रंजना पाटील व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.