एअर इंडिया आस्थापनेत ऑगस्ट २०१९ मध्ये केबीन क्रू (पर्सर व एअर होस्टेस) यांची भरती प्रक्रिया करण्यात आली, त्यांचे हैद्राबाद येथे प्रशिक्षण होऊन वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली. सर्व उमेदवार अनुभवी आहेत. जेट एअरवेज, गो–एअर, इंडिगो यासारख्या नामांकीत विमान कंपन्यांमध्ये त्यांनी नोकरी केलेली आहे. अचानक एअर इंडिया व्यवस्थापनाने फक्त मुंबईमध्ये भरती प्रक्रिया अचानक स्थगित केली. याबाबत मी अर्थसंकल्पीय अधिवेशनात (फेब्रुवारी २०२०) संसदेत सदर मुद्दा उपस्थित केला होता. केंद्रीय हवाई मंत्री यांनी उत्तरादाखल या सर्व उमेदवारांना सेवेत समाविष्ट केले जाईल असे आश्वासन दिले होते. आजमितीस एअर इंडिया कोरोना नंतर आपल्या हवाई सेवेचे विस्तारीकरण करीत आहे म्हणून या अनुभवी उमेदवारांना तात्काळ एअर इंडिया आस्थापनेत समाविष्ट करून घ्यावे याकरिता शिवसेनेच्या सर्व खासदारांच्या सह्यांचे निवेदन केंद्रीय हवाई मंत्री श्री. हरदीपसिंग पूरी यांना खासदार अरविंद सावंत यांच्यासह आज दि. २५ सप्टेंबर रोजी सादर केले. याबाबत सकारात्मक भुमिका न घेतल्यास शिवसेना पध्दतीने आंदोलन केले जाईल असा इशारा दिला.
पुढील पाच महिन्यांत या सर्वांना सेवेत समाविष्ट केले जाईल असे आश्वासन केंद्रीय हवाई मंत्र्यांनी दिले. यावेळेस एअर इंडियाच्या संचालिका (एच.आर.) श्रीमती अम्रिता शरण उपस्थित होत्या.