मुंबई : शिवसेना-भाजपा-रिपाइं (ए)-रासप-शिवसंग्राम-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार श्री.गजानन कीर्तिकर यांच्या प्रचार रथफेरीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून सहाही विधानसभा क्षेत्रातील प्रचार रथफेरीला जनतेचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे.
वर्सोवा विधानसभा क्षेत्रातील रथफेरी प्रचाराची कंट्री क्लब येथे सुरूवात होऊन आझाद नगर नं. १ च्या परिसरात समाप्ती झाली. या रथफेरी दरम्यान स्थानिक महिलांनी महायुतीचे उमेदवार श्री.कीर्तिकर यांचे औक्षण केले. या प्रचार रथफेरीमध्ये भाजपाच्या आमदार भारती लव्हेकर, विधानसभा संघटक यशोधर फणसे, देवेंद्र आंबेरकर, राजेश शेट्ये, हारून खान, राजू पेडणेकर, अग्नेस फर्नांडीस तसेच महायुतीचे कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले होते.