शिवसेनेचा झुंझार आमदार रमेश लटके यांचे दुःखद निधन मनाला चटका लावणारी घटना आहे. तीन वेळा नगरसेवक दुसऱ्यांदा आमदार म्हणून अत्यंत लोकप्रिय, समाजहितासाठी सतत कार्यमग्न असणारा आमचा रमेश लटके ऐन उमेदीत आम्हा सर्वांना अचानकपणे सोडून गेला याचे दुःख सर्वांना होत आहे. एक कुटुंबप्रमुख आपल्या पत्नीला मुलाबाळांना सोडून गेला.
अंधेरी पूर्वचा आमदार म्हणून काम करीत असताना ह्या भागातील खासदार म्हणून रमेश लटकेचा मला फार आधार होता. अशा माझ्या सहकाऱ्याला भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतो.