नागरी उड्डाण मंत्री श्री. ज्योतिरादित्य सिंधीया यांच्या निर्देशानुसार स्थानीय लोकाधिकार समितीच्या पदाधिका-यांसोबत एअर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. राजीव बन्सल यांची राजीव गांधी भवन, नवी दिल्ली मुख्यालयात आज भेट घेतली. यावेळी नागरी उड्डाण मंत्रालयाच्या वतीने श्री. राजीव बन्सल यांच्या सोबत एअर इंडिया एअरपोर्ट सर्विसेसचे मुख्याधिकारी श्री. रामबाबू, एअर इंडिया इंजिनिअरींग सर्विसेसचे मुख्याधिकारी श्री. जोस मैथ्यू, कार्मिक एअर इंडियाच्या संचालिका श्रीमती अमृता शरण आदि उपस्थित होते.
या चर्चेमध्ये एअर इंडिया आणि एअर इंडियाच्या उपकंपनीतील कर्मचा-यांच्या महत्वपूर्ण प्रलंबित असलेल्या मागण्यांवर प्रामुख्याने सखोल चर्चा करण्यात केली.
1. एअर इंडिया एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेड मधील वर्षानुवर्ष कंत्राटी पध्दतीने कार्य करणा-या कर्मचा-यांना कायम स्वरूपी सेवेत समाविष्ट करण्यात यावे. त्याचप्रमाणे पुणे व मुंबई येथील सेवेतून सध्या बाहेर असणा-या कंत्राटी कर्मचा-यांनाही तात्काळ सेवेमध्ये समावून घ्यावेत.
2. एअर इंडियाच्या कर्मचारी वसाहतीत राहणा-या कर्मचा-यांना सेवानिवृत्ती पर्यंत राहण्याची अनुमती देण्यात यावी.
3. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील रक्कम कर्मचा-यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत अबाधित ठेवण्यात यावी.
4. एअर इंडियातील कर्मचा-यांचे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले सर्व प्रकारची थकबाकी तात्काळ देण्यात यावी.
5. एअर इंडियाचे खाजगीकरण झाल्यानंतर एअर इंडिया व तिच्या उपकंपनीतील सर्व कर्मचा-यांना सेवानिवृत्ती पर्यंत नोकरीची हमी देऊन सेवेत असलेल्या व सेवानिवृत्त कर्मचा-यांना वैद्यकीय सुविधा व विमान प्रवास सुविधा आणि इतर तत्सम सुविधा कायम ठेवण्यात याव्यात.
6. कर्मचा-यांच्या प्रलंबित असलेल्या पदोन्नतीचे प्रश्न तात्काळ सोडवण्यात यावेत.
आदी मागण्या आज एअर इंडिया आणि उपकंपनी व लोकाधिकार समितीचे पदाधिका-यांनी एअर इंडियाचे सीएमडी श्री. राजीव बन्सल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली.
एअर इंडियाचे चेअरमन श्री. राजीव बन्सल आणि उपस्थित अधिकारी यांनी कर्मचा-यांच्या सर्व मागण्या लक्षपूर्वक ऐकून घेतल्या व कर्मचा-यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देऊन भविष्यामध्ये कर्मचा-यांच्याच हिताचेच निर्णय घेतले जातील असे आश्वासन दिले.
यावेळी एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष व आमदार श्री. विलास पोतनीस, सरचिटणीस श्री. प्रशांत सावंत, सहसरचिटणीस श्री. बाळा कांबळे, श्री. प्रविण शिंदे, चिटणीस श्री. अजीत चव्हाण व कार्याध्यक्ष श्री. सुनिल निंगावले आदि पदाधिकारी उपस्थित होते.