मुंबई : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातील शिवसेना-भाजपा-रिपाइं (ए)-रासप महायुतीचे उमेदवार श्री.गजानन कीर्तिकर यांच्या गेल्या ५ वर्षातील खासदारकीच्या कार्यकाळातील कामांचा कार्यअहवाल प्रकाशन लोकसभा मुख्य निवडणूक कार्यालय, शेर-ए-पंजाब कॉलनी, अंधेरी (पूर्व) येथे नुकतेच पार पडले. शिवसेना नेते व मंत्री सुभाष देसाई, मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार, राज्यमंत्री रविंद्र वायकर आणि सौ.विद्या ठाकूर, महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर, आमदार अनिल परब, आमदार सुनिल प्रभु, आमदार अमित साटम, आमदार रमेश लटके, आमदार सौ. भारती लव्हेकर, रिपाइं नेते प्रकाश जाधव, पुरूष व महिला विभागप्रमुख,शिवसेना-भाजपा महायुतीचे प्रमुख पदाधिका-यांच्या उपस्थितीत कार्यअहवालाचे प्रकाशन व वाटप संपन्न झाले.
महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या अंधेरी पश्चिम विधानसभेच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन गुलमोहर, जेव्हीपीडी स्कीम, जुहू येथे आमदार अनिल परब, आमदार अमित साटम, सामाजिक कार्यकर्ते अशोक पंडित, जेव्हीपीडी असोसिएशनचे अध्यक्ष परमजित घई, उद्योजक किशोर खाबीया, महिला विभाग संघटक सौ.राजुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक संजय कदम, शिवसेना उपविभाप्रमुख प्रसाद आयरे, शरद जाधव,संजय पवार, युतीचे नगरसेवक उपस्थित होते. तर वर्सोवा विधानसभा क्षेत्रासाठी बेहरामबाग, जोगेश्वरी (पश्चिम) येथे निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी आमदार सौ. भारती लव्हेकर, उपविभागप्रमुख राजू पेडणेकर, राजेश शेट्ये, हारून खान तसेच महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.