२९ मार्च २०१८ रोजी अंधेरी ते गोरेगाव हार्बर लाईन सुरु करण्यात आली. विरार ते गोरेगाव दरम्यान पनवेलच्या दिशेने कामकाजानिमित्त लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा मार्ग सुखकर आणि आरामदायी असल्यामुळे लवकरात लवकर पनवेलसाठी लोकल सुरु करण्यात यावी, अशाप्रकारची मागणी प्रवाशांकडून होऊ लागली. यानंतर संसदेचे अधिवेशनात सातत्याने पाठपुरावा, सलग ३ वर्षे अर्थसंकल्पात मागणी करत, केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे सातत्याने पत्रव्यवहार आणि निवेदने सादर करत, विभागीय रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर १ डिसेंबर रोजी गोरेगाव-पनवेल लोकल सुरु होत आहे.