मुंबई : महायुतीचे उमेदवार श्री.गजानन कीर्तिकर यांचा उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा क्षेत्रातील रथफेरी प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून सर्वत्र त्यांना जनतेचा पाठींबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.
अंधेरी पश्चिम विधानसभेतील टाटा कंपाऊंड, एस.व्ही.रोड, अंधेरी स्टेशन, फिल्मालय स्टुडिओ, डि.एन.नगर परिसरात तर गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील बामणवाडी, कामा वसाहत, सोनालावा रोड, पांडुरंगवाडी, आरे रोड या विभागात महायुतीचे उमेदवार श्री.कीर्तिकर यांनी रथफेरीतून प्रचार केला तर काही ठिकाणी चौकसभा घेवून जनतेशी संवाद साधला. अंधेरी पश्चिम येथे युवकांशी संवाद साधला.
वर्सोवा विधानसभा क्षेत्राच्या प्रचार रथफेरीची कंट्री क्लब पासून सुरूवात झाली. विरा देसाई मार्ग, लिंक रोड, अंधेरी स्पोर्टस् क्लब, ज्ञानेश्वर गार्डन मार्ग, आझाद नगर नं.१ येथे समाप्ती झाली. प्रचार फेरीत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. काही ठिकाणी महायुतीचे उमेदवार श्री.कीर्तिकर यांना महिलांनी औक्षण केले तर ज्येष्ठ नागरिकांशी देखील त्यांनी संवाद साधला.
या प्रचार रथफेरीमध्ये भाजपाचे आमदार अमित साटम, आमदार भारती लव्हेकर, विधानसभा संघटक यशोधर फणसे, देवेंद्र आंबेरकर, संजय कदम, सुनिल खाबीया, प्रसाद आयरे, संजय पवार, शरद जाधव, राजेश शेट्ये, हारून खान, राजू पेडणेकर,अग्नेस फर्नांडीस, विणा टॉक तसेच महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.