मुंबई : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजपा-रिपाइं (ए)-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांनी आज ढोल-ताशाच्या गजरात, महायुतीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जल्लोषात जिल्हाधिकारी कार्यालय, वांद्रे येथे निवडणूक अर्ज दाखल केला.
म्हाडा गेट येथून उमेदवार श्री. कीर्तिकर हे प्रचार रथातून मिरवणूकीव्दारे शिवसेना-भाजपा-रिपाइं (ए)-रासप महायुतीच्या हजारो कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचले. त्यावेळी शिवसेना नेते व मंत्री सुभाष देसाई, विभागप्रमुख व आमदार अनिल परब, राज्यमंत्री रविंद्र वायकर, उपनेते विनोद घोसाळकर, सौ. विद्या ठाकूर, विभागप्रमुख व आमदार सुनिल प्रभु, आमदार विलास पोतनीस, भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष अमित साटम, आमदार भारती लव्हेकर, माजी आमदार राजहंस सिंह, रिपाइं (ए)चे जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव, शिवसेना महिला विभाग संघटिका राजुल पटेल, भाजपाच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सरीता राजपुरे, भाजपाचे जयप्रकाश ठाकूर, रासपचे जिल्हाध्यक्ष मनिष पटेल व शिवसेना-भाजपाचे नगरसेवक व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.