मुंबई पश्चिम उपनगराची ६२.२ लाख लोकसंख्या असताना देखील या परीसरात केंद्रीय विद्यालय व एम्स (AIIMS) रुग्णालय नाही ही बाब निदर्शनास आणून आरे वसाहत येथील २० एकर जागा एम्स रुग्णालयास मिळणेसाठी व जोगेश्वरी रेल्वे हद्दीमधील इंदीरा नगर येथील ५ एकर जागा, किंवा मरोळ पोलीस वसाहतीलगत असलेला रिक्त भुखंड केंद्रीय विद्यालयास मिळणेबाबत केंद्र शासनाला राज्य शासनसने प्रस्ताव सादर करावा अशी मागणी केली. तसेच लोखंडवाला पोस्ट ऑफीस भुखंडावर काही भागात निराधार वृध्दाश्रम आरक्षण आहे. ते देखील आरक्षण हटवून पूर्ण भुखंड पोस्ट ऑफीस साठी उपलब्ध करुन द्यावा अशीही मागणी केली. निटी-पवई, पासपोली, गौतम नगर, फील्टरपाडा, मिलींदनगर परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता गोरेगाव आरे दुग्ध वसाहत या ठिकाणी हिंदू स्मशानभुमी साठी आरक्षित असणारा भूखंड देखील विकसीत करावा अशी मागणी केली. तसेच मालाड पूर्व पिंपरीपाडा व आंबेडकर नगर दुर्धटनेतील जखमींना आर्थिक मदत वाढऊन द्यावी अशीही मागणी केली. या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन मा. मुख्यमंत्री महोदयानी दिले. याप्रसंगी खासदार कीर्तिकर यांचे सोबत पोस्ट मास्तर जनरल, मुंबई सर्कल श्रीमती स्वाती पांडे, संचालिका किया अरोरा, शिवसेना आमदार सुनिल प्रभ, नगरसेविका श्रीमती चंद्रावती मोरे, मा. नगरसेवक बाळा आंबेरकर उपस्थित होते.