लोकसंख्या नियंत्रण दिवसानिमित्त सुदर्शन न्यूज चॅनेलच्या जनजागृती मेळाव्यात सामील

 

लोकसंख्या नियंत्रण दिवसानिमित्त सुदर्शन न्यूज चॅनेलच्या वतीने नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे आयोजित भव्य जनजागृती मेळाव्यात शिवसेनेचे वरिष्ठ खासदार श्री गजानन कीर्तिकर यांनी लोकसंख्या स्फोट रोखण्यासाठी देशातील कायद्याबरोबरच लोकजागृती करण्याची सक्त आवश्यकता असल्याचे सांगितले. आज देशात हिंदूची संख्या कमी होत असून सर्व धर्म समुदायामध्ये ही कायद्याची अंमलबजावणी सारखीच करण्यात यावी आणि जनजागृतीचे कार्य मोठ्या प्रमाणात करण्याची गरज असल्याचे सांगितले. आज भारत देशाची लोकसंख्या १३० करोड पार झाली असून येत्या सन २०५० पर्यंत २०० करोड च्या पार जाणार असून जगात लोकसंख्येच्या बाबतीत भारत देश क्रमांक एक वर असणार असा गंभीर इशारा हि दिला. तसेच हम दो हमारे दो और सबके दो या सुदर्शन न्यूजच्या घोषणेला उत्स्फृत पक्षाचा पांठिबा असल्याचे जाहीर केले. या प्रसंगी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह, कालका पिठाधिषश्वर महंत महामंडलेश्वर, आर्मी कर्नल टीपीएस त्यागी (सेवानिवृत्त), आर्मी जनरल एस पी सिन्हा (सेवानिवृत्त)  हि उपस्थित होते.