मुंबई : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजपा-रिपाइं (ए)-रासप महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवार दि. ६ एप्रिल (गुढीपाडवा) रोजी श्री सिध्दीविनायक मंदिर, सितानगर, जयकोच जवळ, जोगेश्वरी (पूर्व) येथे सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे.
महायुतीचे उमेदवार श्री.कीर्तिकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ शिवसेना नेते व मंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री रविंद्र वायकर, सौ.विद्या ठाकूर, आमदार अॅड.अनिल परब,आमदार सुनिल प्रभु, आमदार अमित साटम, आमदार रमेश लटके, आमदार भारती लव्हेकर सह रिपाईचे मुंबई उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव, रासपचे जिल्हाध्यक्ष मनिष पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. याप्रसंगी शिवसेना महिला विभाग संघटक व नगरसेविका सौ.राजुल पटेल, सौ. साधना माने,भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा श्रीमती सरीता राजपुरे तसेच शिवसेना उपविभागप्रमुख, सर्व नगरसेवक, शाखाप्रमुख, महिला शाखा संघटक, महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
महायुतीचे उमेदवार श्री. कीर्तिकर यांच्या प्रचाराचा नारळ वाढवल्यानंतर जोगेश्वरी पूर्व विधानसभेच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन कॅनोरिटा गारमेंट हब, दलवाई कंपाऊंड, जोगेश्वरी गुंफा रोड, जोगेश्वरी (पूर्व) येथे दुपारी १२ वाजता तर त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता दिंडोशी विधानसभेच्या निवडणूक कार्यालयाचे किशोरी निवास, गाळा नं. १३, हवाहीरा पार्क, कुरारगांव, मालाड (पूर्व)येथे उद्घाटन होणार आहे.