नवी दिल्लीे : लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. विविध विषयांवर मागील पाच वर्षात १ हजारहून अधिक प्रश्न विचारणाऱ्या खासदार गजानन कीर्तिकर यांनी यावेळीही महत्वाचे आणि तितकेच संवेदनशील प्रश्न उपस्थित केलें आहेत. तरुणांना मगरमिठीत घेणाऱ्या ई- सिगारेट विषयी खा. कीर्तिकर यांनी तरुणांमधील आकर्षण आणि त्याचे दुष्परिणाम, ऑल इंडिया मेडिकल सायन्सेस कडून त्यावर केली जाणारी कारवाई आणि शासनाकडून घेतली जाणारी खबरदारी, तरुणांमधील ई – सिगारेट विषयी कमी पडणारी जनजागृकता आणि त्यावर शासनाकडून राबविले जाणारे जागरूकतेचे धोरण याविषयी प्रश्न उपस्थित केला.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने याबाबत दिलेल्या माहितीनुसार ग्लोबल अडल्ट टोबॅको सर्व्हे क्षणानुसार देशातील सुमारे ३ टक्के प्रौढांना ई – सिगारेट विषयी माहिती असून अंदाजे ०.०२ टक्के तरुणांना त्याचे व्यसन आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन च्या अन्वये ई – सिगारेट मुळे गर्भधारणा, प्रजनन क्षमता यावर विपरीत परिणाम व श्वसनाचे विकार त्याचप्रमाणे मुलांच्या मेंदू विकसन आणि आकलन क्षमतेवर देखील याचा परीणाम होत असल्याचे तज्ञांचे मत आहे. दरम्यान याविषयी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जास्तीत जास्त जनजागृती केली जावी यासाठी संबंधित मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे खा. कीर्तिकर यांनी सांगितले.