मुंबई : मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते व मंत्री सुभाष देसाई यांनी गोरेगाव पूर्व येथे सायकल रॅलीचे आयोजन केले होते. त्याला महायुतीचे कार्यकर्ते व स्थानिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.
या सायकल प्रचार रॅलीत सुभाष देसाई यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे कार्यतत्पर उमेदवार गजानन कीर्तिकर यांना निवडून देण्याचे आवाहन केले. या सायकल रॅलीत भाजपाचे जयप्रकाश ठाकूर, महिला विभाग संघटक व नगरसेविका साधना माने, दीपक सुर्वे, नगरसेवक स्वप्निल टेंबवलकर,शितल देवरूखकर-शेठ, शाखाप्रमुख अजित भोगले, दिपक रामाणे आदी महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी सामिल झाले होते.