मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपा युतीची घोषणा झाल्यानंतर शिवसेना-भाजपच्या लोकसभा उमेदवाराच्या निवडणूक प्रचारासाठी संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे प्रचाराची राळ उडवत आहेत. विदर्भ, मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केल्यानंतर उध्दव ठाकरे मुबंई उत्तर-पश्चिम मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या प्रचारार्थ मंगळवार दि. १६ एप्रिल रोजी सायंकाळी गोरेगाव (प.) येथे जाहीर सभा घेणार आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या लक्ष्मी बॅसबेस्टॉस कंपनी मैदान, अयप्पा मंदिर मार्ग, बांगूरनगर, गोरेगाव (प.) येथे होणा-या जाहीर सभेस शिवसेना नेते-उद्योगमंत्री सुभाष देसाई, भाजपाच्या आमदार-राज्यमंत्री विद्या ठाकूर, मुंबई भाजपाचे अध्यक्ष व आमदार आशिष शेलार, रिपाईं आठवले गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. विभागप्रमुख व आमदार अॅड. अनिल परब, विभागप्रमुख व आमदार सुनिल प्रभु, उत्तर-पश्चिम भाजपा अध्यक्ष व आमदार अमित साटम, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव, रासप जिल्हाध्यक्ष मनिष पटेल, महिला विभाग संघटक साधना माने, राजुल पटेल, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष सरीता राजपुरे आदी महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते हे महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.