मुंबई : २७-उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातील शिवसेना-भाजपा-रिपाईं(ए)-रासप-शिवसंग्राम–रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या प्रचारासाठी खास उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा हे १५९-दिंडोशी विधानसभा मतदार संघातील मालाड (पूर्व) कुरार येथे रविवार दि. २१ रोजी सायंकाळी ६ वाजता मालाड (पूर्व), आप्पापाडा रिक्षा स्टंड, आनंद नगर येथे जाहीर सभा घेणार आहे. यावेळी म्हाडाचे अध्यक्ष मधू चव्हाण, राष्ट्रीय उपाध्यक्ष रिपाईं (ए) चे काकासाहेब खंबाळकर, मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार आशिष शेलार, स्थानिक आमदार व विभागप्रमुख सुनील प्रभू, मुंबई भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजहंस सिंह, कामगार नेते अभिजीत राणे, पी उत्तर प्रभाग समिती अध्यक्ष व मुंबई भाजपा सचिव विनोद मिश्रा व इतर मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. तत्पुर्वी श्री. दिनेश शर्मा हे दुपारी ३ वाजता नर्मदा सभागृह, कुरारगांव,मालाड (पूर्व) येथे पत्रकार परिषद घेणार असून नंतर सायंकाळी ४ वाजता त्रिवेणीनगर येथे रिक्षा-टॅक्सी चालक व फेरीवाले यांचेशी संवाद साधणार आहेत.
सदर सभेनंतर रात्रौ ८ वाजता श्री. दिनेश शर्मा यांची गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील प्रेमनगर, गोरेगाव (पश्चिम) याठिकाणी जाहीर सभा होणार आहे. याप्रसंगी शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई, भाजपा आमदार व राज्यमंत्री विद्या ठाकूर,आमदार व विभागप्रमुख सुनिल प्रभू, भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर, नगरसेविका साधना माने, भाजपा मुंबई सचिव समीर देसाई, विधानसभा संघटक राजू पाध्ये, विधानसभा समन्वयक दिपक सुर्वे आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.