नव्याने बांधण्यात येणारे ओशिवरा रेल्वे स्थानकाचे अत्यंत धीम्या गतीने काम चालू होते. सातत्याने पाठपुरावा करून दि. २२ डिसेंबर २०१६ रोजी रेल्वे स्थानकाचे लोकार्पण झाले आहे. ओशिवरा रेल्वे स्थानका नजिक पुरातन राम मंदिर आहे. महाराष्ट्र शासन व मुंबई मनपा यांच्याा दप्तरी देखील राम मंदिर रोड, राम मंदिर परिसर अशीच नोंद असल्यामुळे या रेल्वे् स्थानकाचे ‘राम मंदिर’ असे नामकरण करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. केंद्रीय रेल्वे मंत्री, केंद्रीय गृहमंत्री, महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री, महापौर व गटनेते-मुंबई महानगरपालिका यांच्याकडे पाठपुरावा-प्रस्ताव सादर करून मंजूरी मिळवली व ‘राम मंदिर’ स्थानकाचे नामकरण करण्याबाबत यश मिळाले.
अंधेरी ते गोरेगाव हार्बर लाईन विस्तारीकरणात दिरंगाई होत होती. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून दि.२९ मार्च २०१८ रोजी पासून अंधेरी ते गोरेगाव हार्बर लाईन सुरू करण्यात आली आहे. यामुळे गोरेगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेे सेवा सुरू झाली आहे. या प्रकल्पात बाधीत झालेल्या सर्व पात्र झोपडपट्टी धारकांचे कायमस्वरुपी पुनर्वसन देखील करण्यात आले आहे. तसेच गोरेगाव ते बोरीवली हार्बर लाईन विस्तारीत करण्यासाठी देखील सातत्याने प्रयत्नशील आहे.
अंधेरी व जोगेश्वरी रेल्वे स्थानकांच्या मध्ये आंबोली रेल्वे क्रॉसींग आहे. परिसरालगत मोठ्या प्रमाणात नागरी वसाहत व शाळा असल्यामुळे नागरीक जीव धोक्यात घालून फाटक ओलांडत होते. याबाबत सातत्याने पाठपुरावा करून आंबोली रेल्वे क्रॉसींग येथे पादचारी उड्डानपूल बांधून त्याचे लोकार्पण देखील करण्यात आले आहे. या पादचारी पुलावर खाजगी सुरक्षा रक्षक व देखभालीसाठी कंत्राटदार नेमावा यासाठी देखील प्रस्ताव रेल्वे विभागाला सादर केला आहे.
बान्द्रा ते दहिसर ६ वी रेल्वे लाईन टाकण्यासाठी सातत्याने रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला. या ६व्या रेल्वे लाईनमुळे मुंबई पश्चिम उपनगरीय रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने सन २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात रू. १११८ कोटी निधी मंजूर करून काम प्रगतीपथावर आहे. सन २०२० पर्यंत संपूर्ण ६ वी लाईन टाकण्याचे काम पूर्ण होईल. यामध्येत बाधीत होणा-या सर्व पात्र झोपडपट्टी धारकांचे प्रकल्पग्रस्त म्हणून पुनर्वसन देखील करण्याासाठी मी आग्रही भुमिका स्वीकारली. आजमितीस सर्व बाधीत प्रकल्पग्रस्त पात्र झोपडपट्टी धारकांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यात आले.
पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वें स्था्नकांवर फक्त ४ ठिकाणी सरकते जीने बसविण्याचा प्रस्ताव सन २०१५ साली मान्य झाला होता. परंतु प्रत्येक रेल्वे स्थानकावर सरकते जीने बसविण्याेत यावेत अशी मी सातत्याने रेल्वे मंत्रालयाकडे मागणी करीत होतो. आजमितीस अंधेरी रेल्वे् स्थानक येथे २ सरकते जीने व जोगेश्वरी रेल्वे स्थानक येथे ३ सरकते जीने व ३ लिफ्ट बसविण्याच्या कामाचा शुभारंभ दि. ७ मार्च २०१९ रोजी झाला.
अंधेरी येथे बहुतांश बाहेरगांवी जाणा-या गाड्यांचा थांबा आहे. परंतु याठिकाणी प्रवाश्यांसाठी वेटींग रूम नाही, ही बाब रेल्वे मंत्रालयाच्याा निदर्शनास आणून मंजूरी मिळवली. आजमितीस पुरूष व महिलांसाठी स्वतंत्र वेटींग रूम बांधण्याच्या कामाचा शुभारंभ दि. ७ मार्च २०१९ रोजी झाला आहे.
गोरेगाव-मालाड-कांदिवली येथे पादचारी उड्डानपूल नव्यााने निर्माण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. रेल्वे मंत्रालयाने रू. १७ कोटी ३९ लाख ३१ हजार मंजूर करून आजमितीस तीनही पादचारी उड्डानपूल बांधून लोकार्पण करण्यात आले.
संपूर्ण भारतभर एकूण ५० रेल्वे स्थानके मॉडेल रेल्वे स्टेशन म्हणून सुशोभिकरण योजना आखण्यात आली. यामध्ये अंधेरी व गोरेगाव रेल्वे स्थानके समाविष्ट करण्यात यश प्राप्त झाले.
मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकावरील ९७ फ्लॅटफॉर्मची उंची कमी असल्यामुळे अनेक अपघात होऊन प्रवासी मृत्युमूखी पडत होते. याबाबत रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करून सन २०१५-१६ च्या अर्थसंकल्पींय वर्षात रू. २३ कोटी मंजूर करून घेतले. पैकी रू. १२ कोटी वितरीत देखील झाले. आजमितीस बहुतांश फ्लॅटफॉर्मची उंची वाढविण्यात आली आहे.
भारतीय रेल्वे मध्ये ‘ड वर्ग’ कर्मचा-यांची भरती अनेक वर्षे बंद होती. ४ वर्षे सातत्याने रेल्वे मंत्रालयाशी पाठपुरावा केला. नोव्हेंबर २०१८ रोजी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. संपूर्ण देशातील हजारो युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.
रेल्वे मधील प्रशिक्षणार्थींना (अप्रेन्टीशीप) कायमस्वरूपी रेल्वे आस्थाापनेत समाविष्टे करून घेण्यासाठी पूर्वी धोरण होते. अचानक सन २०१४ पासून सदर धोरण बंद केले, त्याचा निषेध करून सातत्याने मी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला. २० टक्के रेल्वे प्रशिक्षणार्थींना समाविष्ट करून घेण्याचा रेल्वे मंत्रालयाने प्रस्ताव मान्य केला.
वसई-दिवा मार्गे जाणा-या रेल्वे गाड्यांना नायगाव ते जुचंद्र हा २ कि.मी.चा नविन लोहमार्ग सुरू केल्यांस प्रवाश्यांरना सोयीचे होणार आहे तसेच रेल्वेय गाड्यांचा देखील वेळ वाचणार आहे. याबाबत मी सातत्यााने रेल्वेर मंत्रालयाकडे पाठपुरावा करीत आहे. आजमितीस या नविन रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली असून विस्ताार कार्य प्रगतीपथावर आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरात विरार पर्यंत कोकणातील अनेक नागरीक वास्तव्य करीत आहेत. बान्द्रा ते सावंतवाडी व विरार ते सावंतवाडी रेल्वे चालू करावी अशी मागणी मी सातत्याने रेल्वे मंत्रालयाकडे करीत आहे. काही प्रमाणात मान्य होऊन गणपती, दिवाळी व मे महिन्याच्या सुट्टीत या मार्गावर बान्द्रा ते सावंतवाडी रेल्वे गाडी सुरू करण्याात आली आहे. सदर गाडी कायमस्वरूपी सुरू करण्यासाठी पाठपुरावा करीत आहे.
नैसर्गिक आपत्तीत पूर्वसूचना मिळण्याकरिता केंद्र शासनाकडून डॉफलर रडार बसविण्याासाठी निधी उपलब्ध करून घेतला. वेरावली पंपींग स्टेशन, अंधेरी (पूर्व) याठिकाणी लवकरच कामास प्रारंभ होईल.
मरोळ पोलीस कर्मचारी वसाहत, अंधेरी (पूर्व) येथे ५० वर्षांपूर्वी ४५ इमारती बांधल्यास असून अत्यंत जीर्ण अवस्थेत असलेल्या या इमारतींची दुरूस्ती करण्यासाठी महाराष्ट्र शासन व पोलीस विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. आजमितीस रू. ५० कोटी निधी मंजूर होऊन दुरूस्तींचे कामास प्रारंभ झाला.
संपूर्ण हिंदुस्थान देशाला ७५१७ कि.मी.ची किनारपट्टी लाभली असून लाखो मच्छिमार बांधव मच्छीमारीचा व्यवसाय करतात. त्याच्या दैनंदिन गरजा, मुलभूत सुविधा व समस्या यासाठी केंद्र शासनाचे स्वतंत्र मंत्रालय व्हावे म्हणून मा. पंतप्रधान यांना निवेदन सादर करून पाठपुरावा केला. त्यांनी मंजूरी देऊन मत्योद्योग विभाग हा स्वतंत्रपणे स्थापन केला.
वर्सोवा खाडी, अंधेरी पश्चिम येथे अनेक वर्षापासून खाडीमध्ये गाळ साठल्यामुळे मच्छिमार बांधवांना संकटास सामोरे जावे लागत होते. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, महाराष्ट्र राज्य गाळ उपसण्यासाठी तांत्रीकदृष्टया असमर्थ ठरले होते. सदर बाब माझ्या निदर्शनास आल्यानंतर केंद्र शासनाची मे.ड्रेजींग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, विशाखापट्टणम यांचेशी संपर्क साधून तज्ञ अभियंत्यांकडून पाहणी करून खर्चाचे अंदाजपत्रक तयार करून घेतले. या कामासाठी रू. ८० कोटी निधी आवश्यक असल्यामुळे केंद्र शासनाच्या ‘सागरमाला’ योजनेतून सदर गाळ उपसणी करण्याचे केंद्र शासनाने मान्य केले. पहिल्या टप्प्यात रू. ३८ कोटी निधी मंजूर केला. राज्य शासनाने रू. ५ कोटी मंजूर करून गाळ उपसणीच्या प्राथमिक कामास सुरूवात केली. उर्वरीत रू. ३८ कोटीचा निधीचा विनीयोग करण्यासाठी निविदा मागवण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे.
जुहू विमानतळ, मुंबई येथे विमानांसाठी आवश्यक असणारा अॅन्टीना बसविण्याचे काम रखडले होते. याबाबत केंद्रीय मंत्रालयाशी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे आजमितीस अॅन्टींना बसविण्यात आला आहे. सहार विमानतळ येथून विमानाने उड्डान केल्यानंतर जुहू विमानतळाच्या नजिक काही मिनीटे हवाई संपर्कात व्यत्यय येत होता, त्यामुळे हा हवाई अॅन्टीना बसविणे अत्यंत आवश्यक होते.
सी.आर.झेड. नोटीफिकेशन सन २०११ साली प्रसिध्द केल्यानंतर त्याची पुनर्रचना करण्याचे काम गेली ५ वर्षे प्रलंबित आहे. याबाबत संसदेत तारांकित प्रश्न क्र. ६ अन्वये दि. २४/०२/२०१५ रोजी व नियम ३७७ अन्वये दि. २९/११/२०१६ रोजी मी प्रश्न उपस्थित केला असता लवकरच नियमावली प्रसिध्द केली जाईल असे संबंधित मंत्रालयाने मला कळविले आहे. डॉ. नाईक समिती संपूर्ण विस्तृत अहवाल तयार केला असून २७-मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातील विस्तृत सूचना मी सादर केल्यां आहेत. त्यामुळे वर्सोवा, बांगूरनगर-गोरेगाव येथील इमारतींच्या पुनर्विकासासाठी निश्चितच सहाय्य होणार असून या जाचक नियमावलीतून वर्सोवा मच्छिमार वसाहतींना देखील लाभ मिळणार आहे.
२७-मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातील मेघवाडी, जोगेश्वारी पूर्व येथे पोस्ट ऑफीससाठी आरक्षित असलेल्या भुखंडावर पोस्ट ऑफीस बांधून तयार होते. परंतु पोस्ट खात्याच्यास नियमानुसार १५० चौ. फूटाचे क्षेत्रफळ कमी असल्याुमुळे पोस्ट विभाग सदर पोस्ट् कार्यालय हस्तांतरीत करून घेत नव्हते. सातत्याने पाठपुरावा करून सदर पोस्ट ऑफीस पोस्ट विभागाने हस्तांतरीत करून दि. १३ फेब्रुवारी २०१९ रोजी उद्घाटन होऊन कार्यरत झाले आहे.
लोखंडवाला संकुल, अंधेरी पश्चिम येथे पोस्ट कार्यालयासाठी भूखंड राखीव आहे. गेली अनेक वर्षे याठिकाणी पोस्ट ऑफीस बांधण्याचे काम प्रलंबित आहे. या भुखंडावर काही प्रमाणात अतिक्रमण झाले होते. मी स्वत: पाठपुरावा करून सदर अतिक्रमण निष्कासन करून घेण्यास यशस्वी झालो. त्या नंतर या भुखंडाला चारही बाजुंनी संरक्षक भिंत बांधली असून केंद्र शासनाने विद्यमान सन २०१९-२० आर्थिक वर्षात पोस्ट ऑफीस बांधण्यासाठी निधीची तरतुद केली आहे. लवकरच याठिकाणी पोस्ट ऑफीस बांधण्याच्या कामास प्रारंभ होईल.
मोतिलाल नगर, गोरेगाव (पश्चिम) येथे पोस्टांची जी इमारत होती, ती गॅरेंटी पिरीयडमध्येच मोडकळीस आल्यामुळे २ वर्षांपूर्वी तात्काळ रिक्त करण्यात आली. पर्यायी पोस्टर ऑफीसची जागा म्हणून लगतच्या समाज केंद्रामध्येय मी जागा उपलब्धं करून दिली. संबंधित कंत्राटदाराविरुध्द कारवाई करण्यात येत आहे. आजमितीस येथे पोस्टाेची इमारत पुर्नबांधणी करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून संकल्पचित्र व खर्चाचे अंदाजपत्रक मुंबई महापालिकेकडे सादर करण्यात आले आहेत. लवकरच या इमारतीचा पुर्नबांधणीकरणास प्रारंभ होणार आहे.
गोरेगाव (पूर्व), पश्चिम द्रुतगती महामार्गालगत मुस्लीम स्मशानभूमीसाठी ७५०० चौ.मीटरचा भूखंड दुग्ध विकास विभागाकडून हस्तांगतरीत करून घेण्यास यशस्वी झालो. त्याच्या लगतच उभारण्यात आलेली शिवधाम हिंदू स्मशानभूमी देखील तत्कालीन स्थानिक आमदार या नात्याने विकसीत करण्यासाठी मी पाठपुरावा केला होता. याला लागूनच ख्रिश्चन स्मशानभूमीसाठी भूखंड मिळावा म्हणून प्रयत्नशील आहे.
अंधेरी (पश्चिम) येथील आंबोली स्मशानभूमी सुशोभिकरणासाठी रू. २ कोटी निधी मंजूर करून घेतला असून कामास प्रारंभ झाला.
यादव नगर, बांदीवली हिल, अंधेरी (पश्चिम) येथे २३०० घरांमध्येा ८ हजार नागरीक वास्तव्य करीत आहे. सदर भाग डोंगराळ असल्याने मनपा १७० होर्सपॉवर्सची पंपयोजना बसवली होती. सदर योजना अपुरी पडत असल्यांमुळे २५० हॉर्सपॉवरची पंपयोजना कार्यान्वींत करून नवीन जलवाहीन्या टाकण्यात आल्या व पाण्याच्या टाकीची क्षमताही वाढविण्यात आली.
अंधेरी (पश्चिम), यारी रोड येथील श्री.हमीद अन्सारी हा अभियंता युवक अफगाणीस्तान येथे नोकरी निमित्त गेला असता तेथून अवैधरित्या पाकीस्तानात गेला. पाकीस्तानने त्याला गुप्तहेर समजून तुरुंगात ठेवले होते. त्याच्या सुटकेसाठी परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय, भारत व पाकीस्तान वकालात-नवी दिल्ली यांचेकडे सातत्याने पाठपुरावा केला. परिणामी दि. १८ डिसेंबर २०१८ रोजी पाकीस्तानने त्याची निर्दोष मुक्तता केल्यामुळे त्याचे भारतात आगमन झाले.
भारतीय विमान कंपन्यांच्या विमानांमध्ये महिला प्रवाश्यांंची वाढती संख्या लक्षात घेता त्यांच्यासाठी किमान ३ आसने प्रत्येक विमानात आरक्षित असावीत अशी मागणी मी सातत्यााने केंद्रीय मंत्रालयाकडे करीत होतो. त्यांनी मान्यता देऊन आजमितीस हिंदुस्थातनातील प्रत्येक विमान कंपनीत प्रत्येक विमानात महिलांसाठी ३ आसने आरक्षित केली जात आहेत. याबाबत संसदेत दि. ३०/११/२०१५ रोजी शुन्य प्रहरात मी प्रश्न उपस्थित केला होता.
हृदय रोग्यांसाठी कार्डीयाक स्टेन्स टाकणे अत्यंत गरजेचे असते. एका कार्डीयाक स्टेन्स किंमत १.२५ ते १.५० लाख रूपये आकारली जात होती. सर्वसामान्य रूग्णांना सदर उपचार करून घेणे अशक्यप्राय होते. सदर बाब केंद्र शासनाच्या वारंवार निदर्शनास आणून दिल्यानंतर आजमितीस एका कार्डीयाक स्टेयन्सपसाठी फक्त रू. १० हजार आकारण्यात येत आहेत.
एसिक नगर, (राज्य विमा कर्मचारी वसाहत) अंधेरी पश्चिम येथील कर्मचारी वसाहत जीर्णावस्थेत असल्यामुळे त्याचे पुर्नबांधणी करणे गरजेचे असल्याचे वारंवार केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून मंजूरी मिळवली. आजमितीस या कर्मचारी वसाहतीच्या पुनर्बांधणी कामाचा शुभारंभ दि. ८ मार्च २०१९ रोजी झाला.
प्रधानमंत्री रूग्ण सहाय्यता निधीतून सन २०१४ ते २०१९ ह्या कालावधीत माझ्या प्रयत्नाने एकूण १०८ रूग्णांना रू. १ कोटी ४७ लाख २३ हजार ८०४ रूपये इतका निधी मिळवून देण्यास मला यश प्राप्त झाले.